पशुसंवर्धन विभागाचे आज (दि.1 जुलै) एक दिवसीय प्रशिक्षण

    अकोला, दि.30 (जिमाका)- शासनातर्फे पशुसंवर्धन विभागातर्फे प्रथमच शेळ्यांमधील कृत्रिम रेतन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंमलबजावणी साठी पशुसंवर्धन विभाग, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन यांचे मार्फत

 जिल्ह्यात कार्यरत पशुधन विकास अधिकारी वर्ग 1 यांना 'शेळ्यांमध्ये कृत्रिम रेतन' याबाबत एक दिवसीय तांत्रिक प्रशिक्षण शुक्रवार दि.1 जुलै रोजी हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे सकाळी 9 ते सायं.5 या वेळात आयोजीत करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचे उद्घाटन सत्रास जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांची उपस्थिती राहणार आहे.  याप्रशिक्षणामुळे जिल्ह्यात संकरीत जातीच्या शेळ्या जसे की जमनापारी,दमास्कस,उस्मानाबादी इ. प्रकारच्या संकरीत प्रजातीच्या शेळ्या उत्पादनास प्रोत्साहन मिळणार आहे, असे  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जगदीश बुकतारे, डॉ. तुषार बावने,डॉ.राधेश्याम चव्हाण यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ