कोविडःआरटीपीसीआर ‘एक’ पॉझिटीव्ह


अकोला दि.9(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 174 अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. एक व खाजगी शून्य) एक  + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 01.

आरटीपीसीआर ‘एक’

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात एकाचा  अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका बालकाचा समावेश असून हा रुग्ण महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘तीन’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65184(49172+15038+974)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात तीन सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ