‘ढाई आखर’ टपाल विभागातर्फे पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन

 अकोला,दि.27(जिमाका)- ‘ढाई आखर’, या पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन टपाल विभागातर्फे करण्यात आले आहे,असे प्रवर अधीक्षक, अकोला विभाग अकोला यांनी कळविले आहे.

‘भारत 2047 साठी व्हिजन’ या विषयावर विनामूल्य स्पर्धेचे आयोजन टपाल विभागामार्फत करण्यात आले आहे. या स्पर्धेत सर्व वयोगटातील तसेच देशाच्या कोणत्याही भागातील स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतात. विशेषतः युवक व विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना मांडाव्या यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. प्रवेशिका सादर करण्यासाठी दोन श्रेणी असून वय वर्षे 18 पर्यंत आंतरदेशीय पत्र व लिफाफा अशा दोन श्रेणी आहेत. तर वयवर्षे 18 वरील स्पर्धकांसाठीही आंतरदेशीय पत्र व लिफाफा अशा दोन श्रेणी आहेत.  प्रत्येक श्रेणीत प्रथम पारितोषिक 25 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 10 हजार रुपये व तिसरे पारितोषिक 5 हजार रुपये याप्रमाणे पारितोषिके आहेत. स्पर्धा दि.1 जुलै ते दि.31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत होईल. त्यानंतर पोस्टात टाकलेली पत्रे स्विकारली जाणार नाहीत. स्पर्धकांनी आपली पत्रे स्पीड पोस्टाद्वारे सहायक पोस्टमास्तर जनरल, मुंबई प्रदेश, मुंबई-400001 या पत्त्यावर पाठवावीत असे आवाहन प्रवर अधीक्षक कार्यालय, अकोला विभाग, अकोला यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ