कोविडःआरटीपीसीआरमध्ये नऊ पॉझिटीव्ह, पाच डिस्चार्ज

 अकोला दि.25(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 158 अहवाल प्राप्त झाले. त्यात नऊ जणांचा अहवाल आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. नऊ व खाजगी शुन्य) 09+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 09.

आरटीपीसीआर ‘नऊ

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात सहा महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण मुर्तिजापूर येथील एक, अकोला ग्रामीण येथील दोन व सहा जण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

पाच जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात पाच  रुणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘49

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65267(49241+15039+987)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 49 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण असून त्यातील 10 रुग्णालयात दाखल तर अन्य 39 रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना