कोविडःआरटीपीसीआरमध्ये तीन पॉझिटीव्ह, पाच डिस्चार्ज
अकोला दि.24(जिमाका)-
आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे
पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 136 अहवाल
प्राप्त झाले. त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह तर खाजगी लॅब मधून तीन असे एकूण सहा जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर पाच
जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. तीन व
खाजगी तीन) 06+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 06.
आरटीपीसीआर ‘तीन’
आज दिवसभरात
आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिला व एक पुरुषाचा समावेश आहे. हे रुग्ण तेल्हारा,
अकोला ग्रामीण व अकोला महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
पाच जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात पाच रुणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
सक्रिय रुग्ण ‘45’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65258(49232+15039+987)आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 45 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण असून त्यातील आठ
रुग्णालयात दाखल तर अन्य 37 रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत, अशी माहिती जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा