कोविडःआरटीपीसीआर ‘एक’ पॉझिटीव्ह
अकोला दि.14(जिमाका)-
आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे
पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 221 अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह तर खाजगी लॅब मधून पाच असे
एकूण सहा जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालय व
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. एक व खाजगी पाच) सहा +
रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 06.
आरटीपीसीआर ‘एक’
आज
दिवसभरात आरटीपीसीआर
चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका महिलेचा समावेश असून ती रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी
आहे. तसेच खाजगी लॅबच्या अहवालात पाच जणांचे अहवाल
पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त
झाली.
सक्रिय रुग्ण ‘20’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65201(49184+15038+979)आहे. सद्यस्थितीत
जिल्ह्यात 20 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा