आर्या राऊतचे कबड्डीत यश

 


अकोला,दि.20(जिमाका)-येथील समर्थ पब्लिक स्कूल मधील इयत्ता 7 वी ची विद्यार्थिनी आर्या सुनिल राऊत हिचे स्पोर्ट्स आथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत आयोजित कबड्डी प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया (SAI) मार्फत गोव्याच्या राज्य क्रीडा संकुल मापसा येथे दि.6 व 7 जून रोजी चाचणी सामने आयोजित करण्यात आले होते कु.आर्या हिने उत्कृष्ट प्रदर्शन करीत उत्कृष्ट गुणांकन प्राप्त केल्याने तिची पुढील प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. कु. आर्या सुनील राऊत ही जय जगदंबा कबड्डी मंडळाचे नामवंत खेळाडू सुनील राऊत यांची कन्या व मिलिंद राऊत यांची पुतणी आहे कु.आर्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले असून आता तिची पुढील प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ