मुलींसाठी आयटीआय प्रशिक्षण; प्रवेश प्रक्रिया सुरू

 



अकोला,दि.27(जिमाका)- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची, अकोला येथे प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून प्रवेश अर्ज दाखल करणे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे.

यासंदर्भात मुलींना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी समुदेशन केंद्रही सुरु करण्यात आले आहे. प्राचार्य राम मुळे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या गटनिदेशिका रेखा रोडगे, प्रभारी गटनिदेशक प्रशांत बोकाडे, निदेशक अरविंद पोहरकर,सर्व निदेशक आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते. या समुपदेशन केंद्रात प्रवेश प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहिती  तसेच प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्रवेशासाठी इच्छुक महिला तथा मुलींनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज दाखल करावा, असे आवाहन प्राचार्य राम मुळे यांनी केले आहे. 

आयटीआय मुलींची, अकोला येथे दोन वर्षीय अभ्यासक्रमांमध्ये मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स, इन्फोर्मेशन ऍन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी  तर  एक  वर्षीय अभ्यासक्रमामध्ये सेक्रेटरीयल प्रॅक्टिस (इंग्रजी), ड्रेस मेकिंग, बेसिक कॉस्मेटोलॉजी, बेकर अँड कन्फेक्शनर, फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग  असिस्टंट , इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन , फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी इ. व्यवसायांना प्रवेश देण्यात येणार आहे.

आयटीआय चा व्यवसाय केल्यावर शिकाऊ उमेदवार योजनेमध्ये शिकाऊ उमेदवारी मिळते तद्वतच खाजगी तसेच शासकीय आस्थापनेवर नोकरीची सुद्धा संधी असून स्वयंरोजगार सुद्धा स्थापन करता येतो. तसेच पुढील शिक्षणाकरिता पदविका अभ्यासक्रम करायचा असल्यास दुसऱ्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश मिळतो. जिल्ह्याबाहेरील किंवा ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींसाठी संस्थेमध्ये महिला वसतिगृहाची व्यवस्था आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रशिक्षणार्थींना दिला जातो. इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी (आय.एम.सी.) अंतर्गत येणाऱ्या जागेकरीता यावर्षी माफक प्रवेश शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती प्राचार्य मुळे यांनी दिली.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ