सामाजिक न्याय विभागाचे विशेष चित्रप्रदर्शन: 148 छायाचित्रांतून उलगडणार राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा पट

 




अकोला,दि.26(जिमाका)- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन व कार्याची माहिती देणारे चित्रप्रदर्शन अकोला जिल्ह्यात दाखल झाले असून सामाजिक न्याय विभागास डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था अर्थात बार्टीच्या माध्यमातून हे प्रदर्शन जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. जिल्हाभर अकोला जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जाणार आहे.

विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांना विनंती केली होती. त्यानुसार अकोला जिल्ह्यासाठी हा विशेष उपक्रम देण्यात आला आहे, अशी माहिती आ. मिटकरी यांनी दिली.28 डिसेंबर 1917 रोजी छत्रपती शाहू महाराज हे खामगाव येथे शिक्षण परिषदेसाठी आले होते. त्यानंतर ते नागपूर येथेही गेले होते, असा ऐतिहासिक संदर्भ असल्याचा उल्लेख करुन  छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त हे विशेष प्रदर्शन अकोला जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहे,असे आ. मिटकरी यांनी सांगितले.

या प्रदर्शनाची सुरुवात आरकेटी महाविद्यालयापासून करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील सर्व शाळा- महाविद्यालये व जिल्हा परिषद शाळांमधून हे प्रदर्शन दाखविले जाणार आहे. येता महिनाभर हा उपक्रम सुरु राहणार आहे, अशी माहितीही आ. मिटकरी यांनी दिली. या छायाचित्रांमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या जिवनातील महत्त्वाचे प्रसंग, त्यांचे आदेश, दुर्मिळ कागदपत्रे, वास्तू, चित्रे इ. सादर करण्यात आले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या संकलनातून या प्रदर्शनातील छायाचित्रे सादर करण्यात आली आहेत. अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी, विद्यार्थी, युवक-युवतींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन आ. मिटकरी यांनी केले आहे. बार्टीमार्फत समतादूत या प्रदर्शनाचे आयोजन करणार आहेत.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ