शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्यात 168 जणांची प्राथमिक निवड


अकोला
,दि.20(जिमाका)-  येथील  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, यांच्यामार्फत शिकाऊ उमेदवारी  रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन (दि.17)करण्यात आले.

 या मेळाव्यात औरंगाबाद येथील धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लि.या कंपनीच्या वतीने भरती प्रक्रिया राबवण्यात आली. या प्रक्रियेत इलेक्ट्रिशियन ,इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, वेल्डर ,फॅशन टेक्नॉलॉजी , मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स, टर्नर या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये एकूण 168 प्रशिक्षणार्थ्यांची प्राथमिक स्वरूपात निवड करण्यात आली. भरती मेळावा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य पी.एन.जयस्वाल, उपप्राचार्य एस.आर. ठोकरे, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस.बी.घोंगडे, गटनिदेशक रणजीत महल्ले, राजेश धोत्रे तसेच सर्व कर्मचारी आणि व्यवसाय निदेशकांनी परिश्रम घेतले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा