बियाणे महोत्सव;चार दिवसात 7 हजार 106 क्विंटल बियाण्याची विक्री- शांताराम पाटील यांनी खरेदी केले सात क्विं. सोयाबीन बियाणे
अकोला,दि.4(जिमाका)- कृषि विभाग व पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या
संकल्पनेतून शेतकऱ्यांना
घरगुती बियाणे स्वस्त दरात उपलब्ध व्हावे, तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडील बियाणे विक्री करता यावे, यासाठी बियाणे महोत्सव राबविण्यात येत आहे. हा
महोत्सव दि.1 ते 6 जूनपर्यंत प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
आवारात आयोजित केला आहे. आतापर्यंत(दि.4) 14669
क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 7106 क्विंटल बियाणे विक्रीतून एकूण 20 कोटी 56 लक्ष 77 हजार
रुपयांची खरेदी झाली आहे. तर कृषी उत्पन्न बाजार
समिती, अकोला येथून शांताराम पाटील इंगळे यांनी सोयाबीन 9305 चे सात क्विंटल
बियाणे खरेदी केली आहे, अशी
माहिती कृषि विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांतप्पा खोत यांनी दिली.
तालुकानिहाय बियाणे विक्रीची (दि.4)
माहिती याप्रमाणे ; अकोला तालुक्यात 3847.50
क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 1393.75 क्विंटल बियाणे विक्रीतून 4 कोटी 49 लक्ष 70 हजार
रुपये, बार्शीटाकळी तालुक्यात 4336
क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 2815 क्विंटल बियाणे विक्रीतून 6 कोटी 88 लक्ष
रुपये, मुर्तिजापूर तालुक्यात 1454
क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 540.25 क्विंटल बियाणे विक्रीतून 1 कोटी 69 लक्ष 3 हजार
रुपये, पातूर तालुक्यात 1605
क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 820 क्विंटल बियाणे विक्रीतून 2 कोटी 75 लक्ष 50 हजार रुपये, बाळापूर
तालुक्यात 742.50 क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 177.50
क्विंटल बियाणे विक्रीतून 78 लक्ष रुपये, तेल्हारा तालुक्यात 1505.50 क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 1007.25
क्विंटल बियाणे विक्रीतून 2 कोटी 67 लक्ष 68 हजार रुपये तर अकोट तालुक्यात 4050.50
क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 352.75 क्विंटल बियाणे विक्रीतून 1 कोटी 28 लक्ष 87 हजार
रुपये असे एकूण 14669 क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 7106.50
क्विंटल बियाणे विक्रीतून एकूण 20 कोटी 56 लक्ष 77 हजार रुपयांची खरेदी झाली आहे, अशी माहिती कृषि विभागाव्दारे कळविण्यात आली
आहे.
०००००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा