जिल्हा कृतीदल समिती बैठक :शाळानिहाय लसीकरण सत्रांचे नियोजन करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

 


अकोला,दि.20(जिमाका)- जिल्ह्यातील कोविड लसीकरणाला वेग देणे आवश्यक आहे. त्यासाठी आता लवकरच सुरु होणाऱ्या शाळांचे वेळापत्रक लक्षात घेऊन शाळानिहाय लसीकरण सत्रांचे नियोजन करा,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज जिल्हा कृतीदल समिती बैठकीत दिले. जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे राहिलेल्या बुस्टर डोससाठी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सत्र आयोजित करावे,अशी सुचनाही त्यांनी केली.

जिल्हा कृतीदल समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ, मनिष शर्मा, डॉ. अनुप चौधरी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील लसीकरणाबाबत वेग वाढविणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांचे वयोमर्यादेनुसार लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळा सुरु होण्याआधी लसीकरण सत्र शाळानिहाय कसे आयोजित करता येतील, याबाबत नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरोरा यांनी दिले.  जिल्ह्यात लसींचा साठा उपलब्धता व त्याचे वितरण याबाबतही माहिती यावेळी देण्यात आली. प्रशासनातील अधिकारी- कर्मचारी जे फ्रंटलाईन मध्ये होते त्यापैकी काहींचे बुस्टर डोस राहिले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सत्र आयोजित करावे,असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ