शालेय परिवहन समितीवर मोटार वाहन निरीक्षकांची तालुकानिहाय नियुक्ती

 अकोला,दि.३०(जिमाका)-  जिल्ह्यातील प्रत्येक शाळानिहाय शालेय परिवहन समिती असते. अशा समित्यांवर मोटार वाहन निरीक्षक व सहा. मोटार वाहन निरीक्षक यांच्या तालुकानिहाय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, असे उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे.

यासंदर्भात उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,प्रत्येक शाळेत शालेय परिवहन समिती असते. समितीचे अध्यक्ष प्राचार्य /मुख्याध्यापक असतात. पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी तसेच संबंधित क्षेत्राचा वाहतुक निरीक्षक, पोलीस निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, शिक्षण निरीक्षक, बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी, स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधी यांचा समावेश असतो. त्यानुसार जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या सभेतून प्राप्त निर्देशानुसार स्कुल बस धोरणानुसार अकोला शहर व  जिल्ह्यासाठी तालुकानिहाय  खालीलप्रमाणे मोटार वाहन निरीक्षक व सहा. मोटार वाहन निरीक्षक यांच्या नियुक्त्या करण्याचे आदेश  उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिले आहेत. त्यानुसार तालुकानिहाय  मोटार वाहन निरीक्षक व सहा. मोटार वाहन निरीक्षकांची नावे या प्रमाणे-

अकोला व बार्शीटाकळी- प्रफुल्ल मेश्राम- मोटार वाहन निरीक्षक, मनोज शेळके, गजानन हरणे- सहा. मोटार वाहन निरीक्षक.

आकोट तालुका- हेमंत खरावे- मोटार वाहन निरीक्षक, विनोद जाधव, गोपाल पांचाली- सहा. मोटार वाहन निरीक्षक.

पातुर तालुका- अभिजीत टाले- मोटार वाहन निरीक्षक, श्रीमती चैताली आपोतीकर, अंशूल मुर्डीव- सहा. मोटार वाहन निरीक्षक.

तेल्हारा तालुका- गजानन दराडे- मोटार वाहन  निरीक्षक, दिगंबर महाले, दिनेश एकडे- सहा. मोटार वाहन निरीक्षक.

मुर्तिजापूर तालुका- संदीप तुरकणे- मोटार वाहन निरीक्षक, खरात व कृष्णा नेवरे- सहा. मोटार वाहन निरीक्षक.

बाळापूर तालुका- श्रीमती योगिता राणे- मोटार वाहन निरीक्षक, लेनिन ढाले, भागवत चोपडे- सहा. मोटार वाहन निरीक्षक.

या सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या नियुक्त तालुक्याच्या ठिकाणी शालेय  परिवहन समितीच्या बैठकीस उपस्थित राहून स्कुल बस धोरणाबाबत मार्गदर्शन करावे,असे निर्देश श्रीमती दुतोंडे यांनी दिले  आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ