कोविडःआरटीपीसीआर ‘दोन’ पॉझिटीव्ह


अकोला दि.16(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 193 अहवाल प्राप्त झाले. त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह तर खाजगी लॅब मधून तीन  असे एकूण पाच जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. दोन व खाजगी तीन) पाच+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 05.

आरटीपीसीआर ‘दोन’

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात दोघांचा  अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. हे रुग्ण मुर्तिजापूर व अकोला महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच खाजगी लॅबच्या अहवालात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘26

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65209(49188+15038+983)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 26 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ