ग्रा.पं.पोटनिवडणूक; दि. 4,5 व 6 जून रोजी मद्यविक्री बंद
अकोला, दि.3 (जिमाका)- जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतीमधील सहा रिक्त पदांच्या पोटनिवडणुक
होत आहेत. तेथे निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मतदानाच्या एक दिवस आधी (दि.4), मतदानाच्या
दिवशी (दि.5) व मतमोजणीच्या दिवशी (दि.6)
रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. या
आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही
देण्यात आला आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा