आयटीआय प्रवेश अर्ज निश्चिती

 


   अकोला,दि.22(जिमाका)-  येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रतनलाल प्लॉट, येथे आय.टी.आय चे प्रवेशअर्ज निश्चिती सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थ्यांनी आय.टी.आय.प्रवेशासाठी पहिली पसंती दर्शवित प्रवेशअर्ज  निश्चितीसाठी  गर्दी केल्याचे दिसून आले.

प्रवेश अर्ज, फी ऑनलाईन गेटवे च्या माध्यमातून www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन प्रवेश अर्जाची प्रत, सोबत प्रवेश अर्जात केलेल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ कागदपत्रांसह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रतनलाल प्लॉट,अकोला येथे अर्ज निश्चिती (कन्फर्मेशन) करणे अनिवार्य आहे. प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी संस्थेतील माहिती कक्षाशी संपर्क करावा. ऑनलाईन प्रवेश अर्ज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन निश्चिती करावी,  असे प्राचार्य पी.एन.जयस्वाल यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ