हरभरा खरेदी उद्दिष्टात 15 हजार क्वि.ने वाढ

 

अकोला, दि. 9(जिमाका)- हरभरा खरेदीचे भारतीय अन्न महामंडळाकडे शिल्लक राहिलेला उद्दिष्ट नाफेडकडे वर्ग करुन जिल्ह्यांना वितरीत करण्यात आले आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्याकरीता 15 हजार क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हरभरा खरेदी केवळ शेतकऱ्यांचा होणार आहे. त्याचबरोबर सातबारा उताऱ्यावरील फक्त हरभऱ्याचा लागवडीखालील क्षेत्राच्या प्रमाणात उत्पादनानुसार हरभरा खरेदी होईल याची दक्षता  घ्यावी, असे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सहसचिव डॉ.सुग्रिव धपाटे यांनी कळविले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ