विशेष लेख : पावसाळाःसाथरोग नियंत्रण आणि आरोग्य विभागाची सज्जत्ता

 मान्सुनपुर्व तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी निमा अरोरा व मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग सज्ज असून जिल्ह्यामध्ये कुठेही साथजन्य परिस्थिती उद्भवणार नाही याकरीता आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहे.  

अकोला जिल्ह्याची लोकसंख्या(ग्रामीण) 14 लक्ष 28 हजार 654, एकूण तालुके सात, सर्वोपचार रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय एक,  उपजिल्हा रुग्णालय एक, ग्रामीण रुग्णालय पाच, एकुण प्राथमिक आरोग्य केंद्र 30, आरोग्य उपकेंद्र 178, एकूण ग्रामपंचायत 535, एकूण गावे 829, वैद्यकिय पथक जिल्हास्तरावर पाच व तालुकास्तर सात,  जोखीमग्रस्त गांवे तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय संभाव्य पुरांचा पुरांचा धोका असलेली पुरग्रस्त नदी काठावरील गांवे 159 आहे.

साथरोग नियंत्रण कक्ष :  1 जुन ते 31 ऑक्टोंबर 2022 या कालावधीकरीता जिल्हा व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर 24 तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आले आहे. साथरोग नियंत्रण कक्षाचा क्रमांक 0724-2435075 आहे. जिल्ह्यातील ग्रामिण भागातून नियंत्रण कक्षाचा साथरोग व पुर परिस्थिती संबधीत माहीती किंवा संदेश नियंत्रण कक्षास प्राप्त होवून तातडीने प्रभावित ठिकाणी प्रतिबंधात्मक तथा उपचाराची कार्यवाही करण्यात येते. जिल्हास्तरावर दिवसनिहाय साथरोग नियंत्रण पथक स्थापन करण्यात आले असून साथजन्य परिस्थिती उद्भवलेल्या ठिकाणी पथक भेट देते. तसेच  तालूकास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणात प्रतिबंधात्मक कार्यवाही अंमलात आणण्यात येते. त्याचप्रमाणे आपातकालीन पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास तालुकानिहाय स्वतंत्र सात पथके निर्माण करण्यात आली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन असून त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असणारी जोखीमग्रस्त गावे, पुर परिस्थितीची गावे, नदीकाठावरील गावे व ग्रामपंचायतनिहाय सरपंच व ग्रामसेवक यांच्या अद्यावत संपर्क क्रमांकासह माहीती उपलब्ध ठेवण्यात आली आहे. साथरोग नियंत्रण कक्षात 21 प्रकारची अत्यावश्यक औषधी असलेली स्वतंत्र किट्स उपलब्ध आहे. तसेच जिल्हास्तरावर एक शीघ्र प्रतिसाद पथकही कार्यरत आहे.

प्रशासकीय यंत्रणेची सज्जता : सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. रुग्णवाहीका व पर्यायी व्यवस्थेसह रुग्णवाहीका उपलब्ध ठेवण्याबाबत सुचना, जोखीमग्रस्थ गावाचा अतिरिक्त कार्यभार कर्मचाऱ्याकडे देण्यात आला आहे. तसेच जिल्हास्तरावर आंतरविभागीय समन्वय साधण्यात येत आहे.

दैनंदिन सर्व्हेक्षण : आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहुन गृहभेटीच्या माध्यमातुन जलजन्य व किटकजन्य आजारी

रुग्णांचा सर्व्हेक्षणात्मक शोध घेऊन त्यांच्यावर उपचार व प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येते. दैनंदिन सर्व्हेक्षण अधिक प्रभावी होण्याकरीता आशा कार्यकर्तांची मदत घेण्यात येते. याबाबत त्यांना प्रशिक्षीत करण्यात आले आहे.

जोखीमग्रस्त गावाची निवड : जिल्ह्यातील मागील तिन वर्षात साथजन्य आजारांचा उद्भव झालेली गावे, नदीकाठावरील गावे, लाल कार्ड दिलेली गावे व पाणी टंचाई असलेली गावे यांची यादी तयार करण्यात आली आहे. अशा गावांची 160 गावांची निवड जोखीमग्रस्थ गावे निश्चित करण्यात आली आहे.

पाणी गुणवत्ता संनियंत्रण : जलजन्य आजाराच्या प्रभावी नियंत्रणासाठी नागरीकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध राहण्याकरीता पाणी नमुन्यांची नियमित तपासणी करण्यात येते. योग्य दर्जाची ब्लिचिंग पावडर उपलब्ध ठेवण्याबाबत ग्रामपंचायतीना सुचना देण्यात आल्या असून त्याप्रमाणे नियमित निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. पाण्याचे स्त्रोत दुषित होणार नाहीत तसेच पाईपलाईन गळती, व्हॉल्व्ह दुरुस्ती बाबत ग्रामपंचायतींना त्वरीत कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिलेले असतात.

औषधी साठा: प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर मुबलक प्रमाणात औषधी साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.

तसेच आशा कार्यकर्त्यांकडे आवश्यक औषधीसाठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण समिती बैठका: मान्सुनपुर्व तयारीच्या अनुषंगाने माहे जून व जुलैमध्ये बैठका घेऊन गावातील साथरोग संबधीत समस्यांवर उपाययोजना करण्यात येते.

आरोग्य शिक्षण: जिल्ह्यात जलजन्य व किटकजन्य आजाराचा उद्रेक टाळण्याकरीता ग्रामस्तरावर आशा कार्यकर्ता,

आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातुन नागरिकांना आजार व त्यावरील घरगुती प्रथमोपचार याबाबत प्रात्यक्षिकासह

आरोग्य शिक्षण देण्यात येते. तसेच घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी गाळून व उकळून तसेच मेडीक्लोअरच्या गोळ्यांच्या वापराबाबत माहीती देण्यात येते. कोणताही आजार उद्भवल्यास नागरीकांनी आरोग्य संस्थेत जाऊनच औषधोपचार करावा, असे आवाहन कराण्यात आले आहे.

लेखकः

-प्रकाश गवळी, आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला.

(संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ