कोविडःआरटीपीसीआर व रॅपिडमध्ये प्रत्येकी ‘एक’ पॉझिटीव्ह


अकोला दि.17(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 78 अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. एक व खाजगी शुन्य) एक+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह 02.

आरटीपीसीआर ‘एक’

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिलाचा समावेश असून हा रुग्ण मुर्तिजापूर क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘28

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65211(49189+15039+983)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 28 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 49 चाचण्यात एक पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.16) दिवसभरात झालेल्या 49 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे एक,  अकोला महानगरपालिका क्षेत्रात 24, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  तर हेडगेवार लॅब येथे चार चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण 49 चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ