पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

 अकोला,दि.11(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे बुधवार दि.12 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

बुधवार दि.12 रोजी सकाळी नऊ वाजता अमरावती येथून जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला येथे घरेलू महिला कामगारांची आरोग्य तपासणी शिबिर. सकाळी 11 वा. 40 मि. नी दिव्यांगाकरीता फिरते विक्री केंद्र वाटप कार्यक्रम, स्थळ- नियोजन भवन, छत्रपती सभागृह, अकोला., दुपारी 12 वा.40 मि.नी कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या विधवा पत्नीस धनादेश वाटप, स्थळः नियोजन भवन, छत्रपती सभागृह, अकोला, दुपारी 12 वा.50 मि.नी मा.आर.आर.(आबा)पाटील सुंदर गाव योजनेअंतर्गत सुंदर गाव पुरस्कार वितरण सोहळा व कोविड-19 लसीकरणामध्ये पुढाकार घेवून लसीकरण पुर्ण केलेल्या गावांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरण कार्यक्रम स्थळः नियोजन भवन, छत्रपती सभागृह, अकोला त्यानंतर सवडीने दर्यापूर मार्गे अमरावतीकडे प्रयाण.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ