ग्रामपंचायत पोटनिवडणूक; मतदान क्षेत्रात स्थानिक सुटी जाहीर


अकोला, दि.14(जिमाका)-  रिक्त पदाच्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीचा निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान 18 जानेवारी रोजी होत आहे. अकोट तालुक्यातील अकोलखेड, मुर्तिजापूर तालुक्यातील वडगाव व मधापूर, बाळापूर तालुक्यातील मांजरी या ठिकाणी मतदारांना मतदान करता यावे, यासाठी  संबंधित मतदान क्षेत्रात मंगळवार दि. 18 जानेवारी रोजी स्थानिक सुट्टीचे आदेश  जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

ग्रामपंचायतीच्या रिक्‍त पदाच्‍या पोट निवडणुक होणाऱ्या मतदान क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्यांना निवडणुकीच्‍या दिवशी मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी मंगळवार दि. 18 जानेवारी रोजी स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे. तसेच आस्थापनेवरील क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या अधिकारी, कर्मचारी मजुर, कामगार यांना मतदान करता येणे शक्य व्हावे याकरीता कामाच्या तासामधुन दोन तासांची सवलत देण्‍यात यावी, असे आवाहन करण्‍यात येते आहे.  

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ