कोविडः ‘मोबाईल ॲप’द्वारे उपचार सुविधांची माहिती

अकोला, दि.२२(जिमाका)-कोविडचे निदान झाल्यावर उपचार सुविधांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘एमएचसीसीएमएस’ (MHCCMS) अर्थात कोविड केअर मॅनेजमेंट सिस्टीम या मोबाईल ॲपची निर्मिती केली असून या ॲपद्वारे नागरिकांनी माहिती घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

            महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने हे ॲप तयार केले असून www.mahacovid.jeevandayee.gov.in ही हे  ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक आहे. या शिवाय गुगल प्ले स्टोअरवरही हे ॲप उपलब्ध आहे.  

हे ॲप डाऊनलोड केल्यावर आपण आपला जिल्हा, तालुका आदी निवडल्यावर आपल्या भागातील उपलब्ध बेड संख्या, कोणत्या हॉस्पिटल मध्ये किती बेड उपलब्ध आहेत. त्यातही ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर सुविधा, अतिदक्षता विभाग, साधे बेड या प्रमाणे वर्गिकरण करुन मिळेल. तसेच महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची सुविधा उपलब्धता या व अशी विविध प्रकारची माहिती यात उपलब्ध करण्यात आली आहे.या शिवाय अन्य जिल्ह्यातील माहितीही नागरिकांना पाहता येणार आहे.  तसेच त्या त्या रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे. सामान्य नागरिकांना ही माहिती पाहता येणार आहे. जेणेकरुन त्यांना आपल्या घरातील रुग्णाच्या उपचाराबाबत मार्गदर्शन मिळेल. या शिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांना युजर आयडी व पासवर्ड द्वारे, औषधांची उपलब्धता, ऑक्सिजन उपलब्धता याबाबतची माहितीही  जिल्हास्तरावरील नियोजनासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी या ॲपचा वापर कोविड उपचार सुविधा माहितीसाठी करावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

०००००

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ