कोविडःआरटीपीसीआरमध्ये 326 पॉझिटिव्ह, 320 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन 26 पॉझिटीव्ह

अकोला दि.23(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 727 अहवाल प्राप्त झाले. त्यात 326 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून शून्य असे एकूण 326 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. 320 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.22) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 26 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 62331(46903+14816+612) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 326 व खाजगी शुन्य) 326 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 26 = एकूण पॉझिटीव्ह 352.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 356823 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 352810 फेरतपासणीचे 407 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3606 नमुने होते. आजपर्यंत एकूण 356823 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 309920 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 326 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 326 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 130 महिला व 196 पुरुष रुग्ण आहेत.  त्यातील 194 जण हे अकोला हरातील, अकोला ग्रामीण येथील 14, मुर्तिजापूर येथील 58, बार्शीटाकळी येथील 16, पातूर येथील दोन, बाळापूर येथील सात, अकोट येथील 17, तेल्हारा येथील 18 जण रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण 326 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

320 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 320 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

2504 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 62331(46903+14816+612) आहे. त्यात 1148 मृत झाले आहेत. तर 58679 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 2504 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 561 चाचण्यात 26 पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.22) दिवसभरात झालेल्या 561 चाचण्या झाल्या त्यात 26 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोला ग्रामीण येथे 102, बाळापूर येथे पाच, बार्शीटाकळी येथे चार, पातूर येथे तीन, तेल्हारा येथे दोन, अकोला महानगर पालिका क्षेत्रात 247 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर अकोट येथे 93 चाचण्यात सात, मुर्तिजापूर येथे तीन चाचण्यात दोन, जिल्हा आरोग्य कर्मचारी नऊ चाचण्यात तीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 59 चाचण्यात आठ, हेडगेवार लॅब येथे 34 चाचण्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, से एकूण 561 चाचण्या26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ