कोविडः आरटीपीसीआर दोन तर रॅपिड ॲन्टीजेन 'निरंक'

 अकोला दि.(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ३३६ अहवाल प्राप्त झाले. त्यात दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

 दरम्यान काल (दि.३१) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७९१६(४३३०३+१४४३६+१७७)  झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर दोन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य = एकूण पॉझिटीव्ह दोन.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३४४४४३ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३४०७८७ फेरतपासणीचे ४०२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३२५४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३४४४४३ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३०११४० आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

दोन पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत, त्यातील एक स्त्री रुग्ण तर एक पुरुष रुग्ण असून दोघेही मनपा हद्दीतील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

१२ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७९१६(४३३०३+१४४३६+१७७) आहे. त्यात ११४२ मृत झाले आहेत. तर ५६७६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १२ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः१९१ चाचण्यात शून्यपॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.३१) दिवसभरात झालेल्या १९१ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

      काल दिवसभरात अकोट येथे तीन, मुर्तिजापूर येथे तीन, अकोला महानगरपालिका क्षेत्रात १४०, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे २६, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १५ व हेडगेवार लॅब येथे चार अशा एकूण १९१ चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,  असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ