पर्यावरण व मोटारवाहन कर थकित असलेल्या वाहनांवर होणार कार्यवाही


अकोला,दि.27(जिमाका)- खाजगी व व्यावसायिक प्रवासी जुन्या वाहनाना पर्यावरण व मोटारवाहन कर भरणा करुन नोंदणी नुतनीकरन करणे आवश्यक आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अभिलेखावर 15 वर्षे पुर्ण झालेल्‍या खाजगी वाहन व आठ वर्षे पूर्ण झालेल्‍या ट्रॅक, टेम्‍पो, ऑटोरिक्षा बसेस या वाहन धारकांनी 15 दिवसात उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात थकीत पर्यावरण व मोटार वाहन कराचा भरणा करुन वाहन नुतनीकरण करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.

मोटार वाहन नियम 1989 चे 52 (1) नुसार खाजगी वाहनांची नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष पूर्ण झालेल्‍या वाहनांना तसेच परिवहन संवर्गातील मालवाहतुक करणारे लोडींग ऑटो, टेम्‍पो, ऑटोरिक्षा, ट्रक, सर्व बसेस यांची वयोमर्यादा 8 वर्ष पूर्ण झाल्‍यानंतर पर्यावरण कर भरणे अनिवार्य आहे. देय पर्यावरण कराचाथकित वाहन कराचा भरणा विहित मुदतीत न केल्‍यास महाराष्ट्र मोटार वाहन कर कायदा 1958 कलम 12(बी) नुसार वाहन अटकावून ठेवण्‍याची तसेच कराचा भरणा न केल्‍यास वाहन धारंकाकडून जमिन महसुल कायदा 20 अंतर्गत वसुल करण्‍याची तरतूद मोटार वाहन कायद्यामध्ये नमुद केलेली आहे. त्यामुळे 15 वर्षे पुर्ण झालेल्‍या खाजगी वाहन धारकांनी व 8 वर्षे पूर्ण झालेल्‍या ट्रक, टेम्‍पो, ऑटोरिक्षा, बसेस या वाहन धारकांनी वाहनासह 15 दिवसावाहनाचे नोदंणी नुतनीकरण व योग्‍यता प्रमाणपत्र नुतनीकरण तात्‍काळ करून थकित पर्यावरण व थकित मोटार वाहन कराचा भरणा करावा. मुदतीनंतर वाहन जप्‍त करण्‍याची व त्‍यानंतर लिलाव कारवाई करण्‍यात येईल. याची वाहन धारकांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ