कोविडःआरटीपीसीआरमध्ये 230 पॉझिटिव्ह तर 36 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन 54 पॉझिटीव्ह


अकोला दि.13(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 693 अहवाल प्राप्त झाले. त्यात 224 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून सहा असे एकूण 230 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.12) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 54 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 58999(44144+14576+279) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 224 व खाजगी 6) 230 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 54 = एकूण पॉझिटीव्ह 284.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 350150 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 346262 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3486 नमुने होते. आजपर्यंत एकूण 350150 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 306006 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 230 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 224 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 80 महिला व 144 पुरुष रुग्ण आहेत. त्यातील 147 जण हे अकोला हरातील, अकोट तालुक्यातील 19 जण, मुर्तिजापूर येथील 31, अकोला ग्रामीण येथील पाच, बार्शीटाकळी येथील सहा, बाळापूर येथील सात, पातूर येथील दोन, तेल्हारा येथील सात रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण 230 जणांचे  अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

36 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 36 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

983 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 58999(44144+14576+279) आहे. त्यात 1143 मृत झाले आहेत. तर 56873 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 983 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 670 चाचण्यात 54 पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.12) दिवसभरात झालेल्या 670 चाचण्या झाल्या त्यात 54 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात  बार्शीटाकळी येथे  सात, बाळापूर येथे सहा, पातूर येथे चार, तेल्हारा येथे सहा, मुर्तिजापूर येथे तीन, अकोला महानगरपालिका क्षेत्रात 167 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर अकोला ग्रामिण येथे 279 चाचण्यात 19, अकोट येथे 62 चाचण्यात 10, आरोग्य कर्मचारी 49 चाचण्यात एक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 37 चाचण्यात तीन व हेडगेवार लॅब येथे 50 चाचण्यात 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, से एकूण 670 चाचण्यात 54 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ