शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यशाळा

अकोला,दि.६(जिमाका)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे अमृत महोत्सवनिमित्त कान, नाक, घसाशास्त्र विभागात दिनांक २८ व २९ डिसेंबर रोजी हेड नेक लाईव्ह सर्जिकल वर्कशॉप कार्यशाळा संपन्न झाली असून सदरील कार्यशाळेत गरजू सहा रुग्णांची शस्त्रक्रीया पॅरोडेकटोमी व थायराईडटॉमी झाली असून रुग्णांची ह्या कार्यशाळेचा लाभ घेतला. कार्यशाळेचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांचे हस्ते संपन्न झाले.

कार्यशाळेला उपअधीष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गाडगे हे उपस्थित होते. प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. देवेंद्र माहोरे कान, नाक, घसाशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांनी गरजू रुग्णांवर शस्त्रक्रीया यशस्वीरित्या केली असून शस्त्रक्रियेचे थेट प्रात्यक्षिक पदव्युत्तर विद्यार्थ्यांना व कार्यशाळेत सहभाग घेतलेल्या तज्ज्ञ मंडळींना झाला असून पदव्युत्तर विद्यार्थी व विभागातील तज्ञांना मार्गदर्शन केले. प्राध्यापक व प्रमुख डॉ सुधीर पंडीत, शरीररचनाशास्त्र विभाग व सहयोगी प्राध्यापक डॉ. रवि खंडारे, शल्यचिकित्साशास्त्र विभाग आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. ऋषभ बिलाला, क्ष – किरणशास्त्र विभाग यांची व्याख्याने झाली. डॉ. राजेश्री चौरपगार खंडारे, विभाग प्रमुख व डॉ. पराग डोईफोडे व डॉ. भाग्यश्री चिपळूणकर गुप्ता यांनी सदर कार्यशाळा यशस्वी करण्याकरीता त्यांचे मोलाचे योगदान लाभले.

000000

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ