इयत्ता 1 ते 12 वीच्या शाळा सोमवार(दि.24)पासून सुरु; जिल्हाधिकारी यांचे आदेश

अकोला, दि.21(जिमाका)- कोविड प्रादुर्भाव लक्षात घेवून जिल्ह्यातील शहरी ग्रामीण भागाकरिता पारीत करण्‍यात आलेले आदेश कायम ठेवून इयत्‍ता १ ली ते १२ वीच्‍या शाळा सोमवार दि. 24 जानेवारीपासून निर्बंधासह सुरु  करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

 निर्बंध या प्रमाणे :

1.                  शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण(दोन्‍ही मात्रा) झालेले असावे.

2.                  शाळेतील 15 ते 18वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण संबंधित शाळेत करणेबाबत शिक्षणाधिकारी  यांनी आवश्‍यक नियोजन करावे.

3.                  सोमवार दि. 24 जानेवारी पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे व भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी  यांना सादर करावा.

4.                शाळा सुरु करण्यासाठी शासनाने तसेच  जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्‍या मागदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच सदर मार्गदर्शक सुचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार कोविड-19 संदर्भात संबंधित शाळांनी मार्गदर्शक सूचना निश्चित कराव्यात.

5.                 शाळा सुरु करण्‍याबाबत आरोग्‍य, स्‍वच्‍छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना बाबतच्‍या मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्यात यावे.  

6.                  कोविड संदर्भाने  दि. 9 जानेवारी रोजी निर्गमित केलेल्‍या आदेशातील इतर निर्बंध कायम राहतील.

            आदेशाचा भंग करणाऱ्या व्‍यक्‍ती भारतीय दंड संहिता 1860 च्‍या कलम 188 अन्‍वये तसेच आपत्‍ती व्‍यवस्‍थापण कायदा-2005 मधील कलमानुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्‍यात येईल व संबधितावर कलमानुसार कारवाई करण्‍यात यईल.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ