कोविडःआरटीपीसीआर ५४ तर रॅपिड ॲन्टीजेन चार पॉझिटीव्ह

 अकोला दि.(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ५२० अहवाल प्राप्त झाले. त्यात ५० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून चार जणांचे असे एकून ५४ अहवाल पॉझिटीव्ह आला,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

 दरम्यान काल (दि.६) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५८०८१(४३४२६+१४४४४+२११) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. ५० व खाजगी ४) ५४ + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी चार = एकूण पॉझिटीव्ह ५८.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३४६६९४ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३४३०२५ फेरतपासणीचे ४०२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३२६७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३४६६९४ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३०३२६८ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर ५४ पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात ५० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला त्यातील ३१ जण हे अकोला शहरातील, १६ जण मुर्तिजापुर येथील, बार्शी टाकळी, पातूर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात चार जणांचा असा ५४ जणांचा  अहवाल पॉझिटिव्ह आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

१७७ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५८०८१(४३४२६+१४४४४+२११) आहे. त्यात ११४२ मृत झाले आहेत. तर ५६७६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १७७ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः२२७ चाचण्यात चारपॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.६) दिवसभरात झालेल्या २२७ चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

      काल दिवसभरात  अकोला ग्रामिण येथे दोन, अकोट येथे १७, बार्शी टाकळी येथे तीन, पातूर येथे दोन, मुर्तिजापूर येथे पाच, अकोला महानगरपालिका क्षेत्रात ११५, आरोग्य कर्मचारी ३६, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३२, हेडगेवार लॅब येथे १५ अशा एकूण २२७ चाचण्या झाल्या. त्यात हेडगेवार लॅब मधील अहवालात चौघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ