पशुधनाच्या वंध्यत्व उपचारातून खुलेल दुधउत्पादन वाढीचा राजमार्ग - डॉ. सतिश राजू, प्रकल्प संचालक




अकोला,दि.28(जिमाका)- विदर्भातील दुध उत्पादनात अपेक्षित वाढीसाठी उपलब्ध पशुधनाची प्रजनन क्षमता महत्त्वाची आहे. मात्र गाई म्हशीमधील विविध कारणांमुळे उद्भवणारे वंध्यत्वाचे वेळीच  निदान व उपचार केल्यास पशुधनाची प्रजनन क्षमता उत्तम राहून दुधाचे उत्पादन वाढवणे सहजशक्य असल्याचे मत  डॉ. सतीश राजु, प्रकल्प संचालक विदर्भ व मराठवाडा डेअरी डेव्हलपमेंट प्रकल्प यांनी व्यक्त केले.

स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था अकोला येथे  पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड, मदर डेअरी  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पशुवैद्यकिय अधिकारी यांकरिता  दुधाळ जनावरामधील वंधत्व उपचार या विषयावरील एकदिवसीय  प्रशिक्षणाचे उद्घाटनप्रसंगी डॉ. सतिश राजू बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. धनंजय दिघे, सहयोगी अधिष्ठाता आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जे. एम. बुकतारे, मा.जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त, अकोला तसेच  डॉ. एन.पी. पाटील, प्रकल्प समन्वयक उपस्थित होते.

वंधत्व प्रशिक्षणाचे प्रास्ताविक मांडताना प्रा डॉ. चैतन्य पावशे, प्रशिक्षण समन्वयक यांनी उपस्थितांना भाकड  जनावरांना होणारा अतिरिक्त खर्च टाळला जाऊन दुध व्यवसाय व्यवसाय फायदेशीर करता येत असल्याचे सांगितले. प्रशिक्षणासाठी अकोला, अमरावती, बुलढाणा व यवतमाळ येथून एकूण 24  सहाय्यक आयुक्त व पशुधन विकास अधिकारी हे उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गात डॉ.पी.श्रीधर, राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड डॉ.सी.एच.पावशे, विभागप्रमुख व प्रशिक्षन समन्वयक, डॉ. एम. व्ही. इंगवले व डॉ.एस.जी.देशमुख यांनी विविध विषयावर तांत्रिक मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रवीण बनकर व आभार प्रदर्शन डॉ.महेश इंगवले प्रशिक्षन समन्वयक यांनी केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ