कोविडःआरटीपीसीआरमध्ये 50 पॉझिटिव्ह, दोन डिस्चार्ज तर एकाचा मृत्यू; रॅपिड ॲन्टीजेन सात पॉझिटीव्ह


अकोला दि.10(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 221 अहवाल प्राप्त झाले. त्यात 40 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 10 असे एकूण 50 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 58320(43613+14470+237) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 40 व खाजगी 10) 50 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 7 = एकूण पॉझिटीव्ह 57.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 348093 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 344366 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3325 नमुने होते. आजपर्यंत एकूण 348093 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 304480 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 50 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 40 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 13 महिला व 27 पुरुष रुग्ण आहेत. त्यातील 35 जण हे अकोला हरातील, तीन जण अकोला ग्रामीण येथील तर बाळापूर व बार्शिटाकळी येथील प्रत्येकी एक रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण 50 जणांचे  अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

दोघांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून दोघांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

एकाचा मृत्यू

आज दिवसभरात एकाचा मृत्यूची नोंद झाली. हा रुग्ण बैदपुरा, अकोला येथील 69 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 8 जानेवारी रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

413 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 58320(43613+14470+237) आहे. त्यात 1143 मृत झाले आहेत. तर 56764 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 413 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 477 चाचण्यात सात पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.9) दिवसभरात झालेल्या 477 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात  बाळापूर येथे दोन,  बार्शीटाकळी येथे  एक, तेल्हारा येथे एक, मुर्तिजापूर येथे दोन, अकोला महानगरपालिका क्षेत्रात 147, आरोग्य कर्मचारी 30, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 23 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर अकोला ग्रामिण येथे 253 चाचण्यात चार व हेडगेवार लॅब येथे 18 चाचण्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशा एकूण 477 चाचण्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ