‘स्वाधार’ योजनेअंतर्गत अर्ज करण्यास २८ फेब्रु.पर्यंत मुदतवाढ

         अकोला दि.(जिमाका)- शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकलेल्या अनुसुचित जाती नव बौद्ध             घटकातील  इयता दहावी नंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक साहित्य स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  स्वाधार योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थी विद्यार्थिनींना  अर्ज करण्यासाठी दि.२८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड यांनी दिली आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्याच्‍या ठिकाणी तसेच अकोला महानगरपालिका हद्दीपासुन ५ कि. मी. च्‍या परिसरात असलेली महाविद्यालये/ शैक्षणिक संस्‍थेत इयत्‍ता ११ वी, १२ वी तसेच इयत्‍ता १२ वी नंतरच्‍या व्‍यावसायीक तसेच बिगर व्‍यावसायीक अभ्‍यासक्रमांमध्‍ये शिक्षण घेत असलेल्‍या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्‍या, प्रवेश मिळालेल्‍या विद्यार्थ्यांना तथा वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्‍या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्‍हणुन, भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्‍वतः उपलब्‍ध करून घेण्‍यासाठी आवश्‍यक रक्‍कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्‍नीत बॅंक खात्‍यात थेट जमा करण्यात येते. कोरोना १९ च्‍या प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ व सन २०२१-२२ या कालावधीतील भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्‍यासाठी मार्गदर्शक सुचना प्राप्‍त झाल्या आहेत. त्यानुसार पात्र ठरणाऱ्या  विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज  (१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अकोला (२) गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह अकोला (३) मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह अकोला संतोषी माता मंदीराजवळ अकोला, () मागावर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मित्र नगर, अकोला येथे (मुलांनी मुलाच्‍या वसतिगृहामध्‍ये व मुलींनी मुलीच्‍या वसतिगृहामध्‍ये अर्ज सादर करावे.)  हे अर्ज स्विकारण्यास दि.२८  फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.तरी दिलेल्‍या मुदतीमध्‍ये अर्ज सादर करावे, असे आवाहन समाजकल्‍याण विभागाच्या सहाय्यक आयुक्‍त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ