274 ग्रामपंचायत प्रभागांच्या सीमा निश्चितीकरीता कार्यक्रम जाहिर; 4 मार्चपर्यंत दावे हरकती दाखल करा


अकोला,दि.28(जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरीता प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यासाठी नव्याने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहिर केला आहे. प्रभाग रचना कार्यक्रमानुसार प्रारुप प्रभाग रचनेला दि. 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल व त्यावर हरकती दावे दि. 4 मार्च रोजी दाखल करता येतील. तर प्राप्त हरकतीवर निर्णय दि. 29 मार्च रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

प्रभाग रचना कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच आयोगाचा प्रभाग रचना व आरक्षणाबाबतचा कार्यक्रम चुकीच्या पद्धतीने राबविल्यामुळे निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या 274 ग्रामपंचायतीची प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यात येणार आहे. ते याप्रमाणे : तेल्हारा तालुक्यातील 23, अकोट तालुक्यातील 44, मुर्तिजापूर तालुक्यातील 51, अकोला तालुक्यातील 54, बाळापूर तालुक्यातील 27, बार्शीटाकळी तालुक्यातील 47, पातूर तालुक्यातील 28 अशा एकूण 274 ग्रामपंचायत प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यात येणार आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ