हवामान विभागाचा इशाराःअवकाळी पावसाची शक्यता यंत्रणांनी सज्ज राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 अकोला,दि.७(जिमाका)- भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार येत्या ११ तारखेपर्यंत विदर्भातील जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह  पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या पार्श्वभुमिवर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी   आपल्या शेतमालाला सुरक्षित ठिकाणी ठेवावे. बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणला असल्यास  मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. वीजांच्या कडकडाटापासून तसेच गारपीट झाल्यास स्वतःचा व आपल्या पशुधनाचा बचाव करावा, सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. तसेच या पार्श्वभुमिवर सर्व यंत्रणांनी सज्ज  राहून दक्षता घ्यावी असे निर्देशही दिले आहेत.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ