प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण

 अकोला, दि.२४(जिमाका)-भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे बुधवार दि.२६ रोजी सकाळी सव्वा नऊ वा. होणार आहे. याप्रसंगी  राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण  होईल. कोविड साथीच्या पार्श्वभुमिवर कोविड नियमांचे पालन करीत मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. यासंदर्भात शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, या दिवशी सकाळी साडेआठ ते दहा या दरम्यान  ध्वजारोहणाचा अन्य कोणताही  शासकीय अथवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. अशा ठिकाणी हे कार्यक्रम सकाळी साडेआठ वा. पूर्वी किंवा दहा वा. नंतर आयोजित करावे,असे परिपत्रकान्वये स्पष्ट करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ