पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

अकोला,दि.25(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे बुधवार दि.26 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

बुधवार दि.26 रोजी सकाळी 9 वा.10 मि.नी शासकीय विश्रामगृह, अकोला येथून लाल बहादुरशास्त्री स्टेडीयमकडे प्रयाण व सकाळी 9 वा.14 मि.नी आगमन.  सकाळी सव्वानऊ वाजता 72 व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थिती व सलामी स्विकृती, परेड निरीक्षण, संदेश वाचन. सकाळी पावणेदहा वाजता विविध विभागाचे पुरस्कार वितरण व स्व.आर.आर. पाटील सुंदर गाव योजनेचे पुरस्कार वितरण. सकाळी सव्वादहा वाजता गाडगेबाबा घर (बेघर निवारा) मनपा अकोला येथे भेट.

सकाळी 11.00 वाजता पशुवैद्यकीय महाविद्यालय बाबत बैठक स्थळ: नियोजन भवन, छत्रपती सभागृह, अकोला, सकाळी 11 वा. 20 मि.नी जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियमाक परिषद व व्यवस्थापकीय समितीची आढावा सभा स्थळ: नियोजन भवन, छत्रपती सभागृह, अकोला. सकाळी पावणेबारा वाजता लोटस ग्रीन(म्हाडा साईट) वृंदावन बिल्डींगचे बाजूला गिता नगर येथे बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचा उद्धाटन सोहळास उपस्थित. दुपारी सव्वाबारा वाजता मंचनपूर(सावरा) ता.अकोटकडे प्रयाण व दुपारी सव्वावाजता अभंग कॉटन इंडस्ट्रीज, मंचनपूर(सावरा)च्या उद्धाटन कार्यक्रमास उपस्थिती.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ