कोविडःआरटीपीसीआरमध्ये 53 पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू, 192 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन दोन पॉझिटीव्ह


अकोला दि.31(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 152 अहवाल प्राप्त झाले. त्यात 41 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 12 असे एकूण 53 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 192 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, तसेच तिघांचा मृत्यूची नोंद झाली, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.30) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64057(48342+14898+817) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 41 व खाजगी 12) 53 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 2 = एकूण पॉझिटीव्ह 55.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 361100 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 357030 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3660 नमुने होते. आजपर्यंत एकूण 361100 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 312758 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 53 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 41 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 19 महिला व 22 पुरुष रुग्ण आहेत.  त्यातील 37 जण हे अकोला हरातील, अकोला ग्रामीण येथील एक, पातूर येथील दोन, बार्शीटाकळी येथील एक रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात 12 अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण 53 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

192 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 192 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

तिघांचा मृत्यू

दरम्यान आज तिघांचा मृत्यूची नोंद झाली. त्यात न्यु तापडीया नगर, अकोला येथील 72 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 23 जानेवारी रोजी दाखल केले होते. तर पातुर तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 29 जानेवारी रोजी दाखल केले होते, तसेच गौरक्षण रोड, अकोला येथील 70 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 31 जानेवारी रोजी दाखल केले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

1514 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64057(48342+14898+817) आहे. त्यात 1156 मृत झाले आहेत. तर 61387 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1514 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 388 चाचण्यात दोन पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.30) दिवसभरात झालेल्या 388 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात बार्शीटाकळी येथे दोन, पातूर येथे दोन, तेल्हारा येथे तीन,  अकोला महानगर पालिका क्षेत्रात 356, जिल्हा आरोग्य कर्मचारी दोन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 15 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर हेडगेवार लॅब येथे आठ चाचण्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, से एकूण 388 चाचण्यात दोन  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ