कोविडःआरटीपीसीआरमध्ये 381 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, 320 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन 11 पॉझिटीव्ह

अकोला दि.25(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 978 अहवाल प्राप्त झाले. त्यात 381 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून शुन्य असे एकूण 381 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. एकाचा मृत्यूची नोंद झाली. तर 320 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.24) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 62938(47385+14834+719) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 381 व खाजगी शुन्य) 381 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 11 = एकूण पॉझिटीव्ह 392.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 358181 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 354141 फेरतपासणीचे 407 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3633 नमुने होते. आजपर्यंत एकूण 358181 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 310796 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 381 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 381 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 156 महिला व 225 पुरुष रुग्ण आहेत.  त्यातील 177 जण हे अकोला हरातील, अकोला ग्रामीण येथील पाच, मुर्तिजापूर येथील 68,  बाळापूर येथील नऊ, अकोट येथील 29, तेल्हारा येथील 25, बार्शीटाकळी येथील 24 व पातूर येथील 44 जण रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण 381 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

320 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 320 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज एकाचा मृत्यूची नोंद झाली. हा रुग्ण सिंधी कॅम्प, शास्त्री नगर, अकोला येथील 63 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 17 जानेवारी रोजी दाखल केले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

2666 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 62938(47385+14834+719) आहे. त्यात 1151 मृत झाले आहेत. तर 59121 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 2666 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 478 चाचण्यात 11 पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.24) दिवसभरात झालेल्या 478 चाचण्या झाल्या त्यात 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोला ग्रामीण येथे 92, अकोट येथे 78, अकोला महानगर पालिका क्षेत्रात 219 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर तेल्हारा येथे दोन चाचण्यात एक, जिल्हा आरोग्य कर्मचारी 16 चाचण्यात चार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 47 चाचण्यात एक, हेडगेवार लॅब येथे 24 चाचण्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, से एकूण 478 चाचण्यात 11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम