व्याघ्र समितीचा घेतला आढावा; समन्वय साधून वन्यप्राणी संरक्षणासाठी प्रयत्न करा



 

अकोला दि.13 (जिमाका)- गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील काही भागात वाघ/बिबट सदृष्य वन्यप्राण्याचे पाउलखुणा आढळून आल्या. अशा भागात आवश्यक ते खबरदारी घेवून उपाययोजना राबवावी. तसेच वन्यप्राणी सुरक्षित राहिल याकरीता वन विभाग व व्याघ्र समितीच्या सदस्यांनी समन्वय साधून वन्यप्राण्याच्या सरंक्षणासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी केले.

            वन्यप्राण्याचे सुरक्षता व आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हास्तरीय व्याघ्र कक्ष समितीची बैठक आज पडली. यावेळी उपवनसंरक्षक प्रादेशिक तथा व्याघ्र समितीचे अध्यक्ष अजुना के. आर., विभागीय वनअधिकारी वन्यजीव  व्याघ्र समितीचे सदस्य अनिल निमजे, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, महावितरचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, महावितरणचे कार्यकारी अभियंता विजयकुमार के.कासट, मानद वन्यजीव रक्षक  विक्रम राजुरकर, बाळ काळणे, नायब तहसिलदार महेंद्र कुमार आत्राम, सहाय्यक वनसंरक्षक एस.ए. वडोदे, अकोला वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एन.ओवे, बार्शीटाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी.डांगे उपस्थित होते.

 वन्यजीव आढळण्याऱ्या भागातील शेतात इलेक्ट्रीक करंट तार फेंन्सीग लावतात. त्यामुळे  वन्यप्राण्याची जिवीतहाणी होण्याची शक्यता असल्याने अशा ठिकाणचे करंट तार फेन्सीग तात्काळ काढावे. अवैध रेतीचा उपसा रात्रीच्या वेळी बंद करावे. तसेच वन्यक्षेत्रात पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी संबंधितांना दिल्या.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ