कोविडःआरटीपीसीआरमध्ये 291 पॉझिटिव्ह, 396 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन 14 पॉझिटीव्ह


अकोला दि.28(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 772 अहवाल प्राप्त झाले. त्यात 261 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 16 असे एकूण 277 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 396 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.27) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 14 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 63657(47999+14872+786) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 261 व खाजगी 16) 277 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 14 = एकूण पॉझिटीव्ह 291.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 359887 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 355823 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3654 नमुने होते. आजपर्यंत एकूण 359887 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 311888 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 277 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 261 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 112 महिला व 149 पुरुष रुग्ण आहेत.  त्यातील 143 जण हे अकोला हरातील, अकोला ग्रामीण येथील नऊ, पातूर येथील 10, बाळापूर येथील 16, बार्शीटाकळी येथील 12, तेल्हारा येथील 29, अकोट येथील 20, मुर्तिजापूर येथील 22 रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात 16 अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण 277 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

396 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 396 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

2081 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 63657(47999+14872+786) आहे. त्यात 1151 मृत झाले आहेत. तर 60425 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 2081 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 317 चाचण्यात 14 पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.27) दिवसभरात झालेल्या 317 चाचण्या झाल्या त्यात 14 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोला ग्रामीण येथे दोन,  बाळापूर येथे पाच, बार्शीटाकळी येथे आठ, तेल्हारा येथे दोन, अकोला महानगर पालिका क्षेत्रात 167, जिल्हा आरोग्य कर्मचारी येथे सहा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 25 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर अकोट येथे 73 चाचण्यात पाच, मुर्तिजापूर येथे 10 चाचण्यात दोन, हेडगेवार लॅब येथे 19 चाचण्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, से एकूण 317 चाचण्यात 14 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ