शासकीय व खाजगी आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती 31 जानेवारीपर्यंत सादर करा
अकोला दि.10(जिमाका)- जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्याच्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची डिसेंबर 2021 अखेरचे त्रैमासिक विवरण नमुना ईआर-1 ची सांख्यिकी माहिती सोमवार दि. 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले.
सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना
सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम5(1) नुसार प्रत्येक तिमाहीस विहीत नमुना ईआर-1
मध्ये नियमीतपणे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे
बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने डिसेंबर 2021 अखेर संपणाऱ्या
तिमाही नमुना ईआर-1 (ER-1) मधील त्रैमासिक
सांख्यीकीय माहीती नोदणीकृत सर्व आस्थापनांनी यापुर्वी
दिलेल्या युझर नेम व पासवर्डचा वापर करुन www.rojgar.mahaswayam.gov.in या
संकेतस्थळावर त्रैमासिक विवरण पत्र विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने
सादर करावे.
तसेच प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशील, आवश्यक सर्व माहीती नोंदवून अद्यावत करावा. त्रैमासिक ईआर-1 किंवा आपला नोंदणी तपशील अद्यावत
करतांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास akolarojgar@gmail.com या ई-मेल
आयडी किंवा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयाच्या
0724-2433849 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क
साधावा.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा