अंगणवाडी सेविका/मदतनिस पदाची पदभरती; 27 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

            अकोला, दि.20(जिमाका)- एकात्मिक बाल विकास सेवा योजना अकोला ग्रामपंचायत एक व दोन अंतर्गत तालुक्‍यातील विविध ठिकाणच्या अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनिस या पदाची पदभरती होणार आहे. यात अंगणवाडी सेविकाचे सात, मिनी सेविकाचे पाच तर मदतनिसचे तीन असे एकुण 15 पदाची पदभरती होणार आहे. या पदभरतीस इच्छुक लाभार्थ्यांनी गुरुवार दि. 27 जानेवारीपर्यंत अर्ज करा, असे आवाहन एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प ग्रा 1 व 2 चे बाल विकास प्रकल्‍प अधिकारी अमित रायबोले यांनी केले आहे.

             मौजे मारोडी, रोहना, नवथळ, टाकळी जलम येथील चार अंगणवाडी सेविका, मजमपुर क्र. तीन व सुलतान अजमपुर  (बेंदरखेड) येथील दोन मिनीसेविका, आपोती बु. व कंचनपुर येथील दोन मदतनिस पदाचे तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना अकोला ग्रा. 2 अंतर्गत तालुक्‍यातील मौज सांगळुद क्र. एक पळसो, खुर्द व येळवण येथील तीन अंगणवाडी सेविका, कानशिवणी क्र. पाच, कुंभारी क्र. चार व बोरगांव मंजु क्र. 16 येथील तीन मिनी सेविका, बोरगाव मंजु क्र. एक येथील एक मदतनिस असे एकुण 15 पदांच्या पदभरतीचे जाहीरनामा संबंधीत गावचे ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्राच्‍या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच याबाबत संबंधित ठिकाणी दंवडीही देण्यात आली आहे. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज गुरुवार दि. 27 जानेवारीपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळुन) कार्यालयीन वेळेत एकात्मिक बाल विकास सेवा  योजना कार्यालय मोर्णा वसाहत सिव्हिल लाईन रोड निवड मंडळाची जुनी बिल्डिग अकोला येथे करावा.

आवश्यक पात्रता :अंगणवाडी सेविका पदासाठी दहावी उर्त्‍तीण, अंगणवाडी मदतनिस पदाकरीता सातवी उर्त्तीण असल्‍याचे गुणपत्रक, स्‍थानीक रहिवासी दाखला, मराठी भाषेचे ज्ञान असावे, लहान कुंटुंबाची अट लागु राहील, तसेच विधवा, अनाथ मुली, अनुसुचित जाती, जमाती, इतर मागास वर्गीय तसेच अंगणवाडी सेविका, मदतनिस पदावर कमीत कमी दोन वर्षाचा शासकीय अनुभव असणाऱ्याना  प्राधान्‍य राहिल.   

इच्छुक लाभार्थ्यांनी जास्तीत जास्ती संख्येत अर्ज भरुन पदभरती प्रक्रियेस सहभागी व्हावे, असे आवाहन एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प ग्रा 1 व 2 चे बाल विकास प्रकल्‍प अधिकारी अमित रायबोले यांनी केले

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम