कोविडःआरटीपीसीआरमध्ये 254 पॉझिटिव्ह, दोन मृत्यू तर 90 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन 37 पॉझिटीव्ह

 

अकोला दि.16(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 660 अहवाल प्राप्त झाले. त्यात 231 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 23 असे एकूण 254 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 90 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.15) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 37 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 59796(44743+14649+404) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 231 व खाजगी 23) 254 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 37 = एकूण पॉझिटीव्ह 291.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 351872 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 347948 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3522 नमुने होते. आजपर्यंत एकूण 351872 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 307129 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 254 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 231 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 103 महिला व 128 पुरुष रुग्ण आहेत.  त्यातील 157 जण हे अकोला हरातील, अकोट तालुक्यातील 23, मुर्तिजापूर येथील 23, अकोला ग्रामीण येथील 12, बार्शीटाकळी येथील सात, बाळापूर येथील तीन, तेल्हारा येथील एक, पातूर येथील पाच रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात 23 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण 254 जणांचे  अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

90 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 90 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

दोन जणांचा मृत्यू

दरम्यान आज दोन जणांचा मृत्यूची नोंद झाली. त्यात मूर्तिजापूर येथील ८४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ११ जानेवारी रोजी दाखल केले होते. तर जुने शहर, अकोला येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. ९ जानेवारी रोजी दाखल केले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

1532 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 59796(44743+14649+404) आहे. त्यात 1145 मृत झाले आहेत. तर 57119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1532 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 510 चाचण्यात 37 पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.15) दिवसभरात झालेल्या 510 चाचण्या झाल्या त्यात 37 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात बाळापूर येथे पाच, बार्शीटाकळी येथे पाच, पातूर येथे चार, तेल्हारा येथे दोन, मुर्तिजापूर येथे एक, अकोला महानगर पालिका क्षेत्रात 101, आरोग्य कर्मचारी 41 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर अकोला ग्रामीण येथे 225 चाचण्यात नऊ, अकोट येथे 39 चाचण्यात सहा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 49 चाचण्यात दोन, हेडगेवार लॅब येथे 38 चाचण्यात 20 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, से एकूण 510 चाचण्या37 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ