पशुसंवर्धन विभागः वैयक्तिक लाभ योजनांसाठी दि.१६पर्यंत कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा

 अकोला दि.१२(जिमाका)- नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विविध वैयक्तिक लाभाच्या योजनाकरीता निवड झालेल्या लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याकरीता आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन  पद्धतीने रविवार दि. १६ पर्यंत अपलोड करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

पशुसंवर्धन विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या दुधाळ गाई व म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे अशा विविध योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया २०२१-२२ या वर्षात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. (प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसह) अशा लाभार्थ्यांनी दि. १२ ते १६ या कालावधीत (दि.१६च्या  रात्री १२ वाजेपर्यंत) पशुसंवर्धन विभागाच्या https://ah.mahabms.com  संकेतस्थळावर तसेच अँड्रॉईड मोबाईल ॲप्लीकेशन  AH-MAHABMS  व्दारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

 ०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम