सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, महोत्सव आयोजनातून द्या पर्यटनाला चालना- जिल्हाधिकारी निमा अरोरा

 




अकोला,दि. २५(जिमाका)- जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना चालना देण्याकरीता सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यटन महोत्सव अशा विविध उपक्रम राबवा. याकरीता पर्यटन स्थळावर सोईसुविधा निर्माण करुन पर्यटन स्थळांची साखळी तयार होईल याचे नियोजन करा. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सुट्टीच्या कालावधीत पर्यटन स्थळाला थेटी देवून पर्यटनास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जागतिक पर्यटन दिनानिमित्त त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले,  आदी उपस्थित होते.

कोरोना प्रादुर्भावामुळे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोविड-१९ च्या उपाययोजना राबवून जिल्ह्यातील महान, काटेपुर्णा अभयारण्य, नरनाळा किल्ला, बाळापूर येथील ऐतिहासीक स्थळे अशा विविध पर्यटन स्थळांना प्रोत्साहन देण्याकरीता प्रशासनाव्दारे उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी यावेळी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ