कोविडःआरटीपीसीआरमध्ये 437 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, 284 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन 32 पॉझिटीव्ह

 अकोला दि.20(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 826 अहवाल प्राप्त झाले. त्यात 384 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 53 असे एकूण 437 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 284 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, तसेच एकाचा मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.19) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 32 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 61153(45896+14761+496) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 384 व खाजगी 53) 437 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 32 = एकूण पॉझिटीव्ह 469.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 354504 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 350518 फेरतपासणीचे 407 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3579 नमुने होते. आजपर्यंत एकूण 354504 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 308608 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 437 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 384 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 137 महिला व 247 पुरुष रुग्ण आहेत.  त्यातील 215 जण हे अकोला हरातील, अकोला ग्रामीण येथील 15, मुर्तिजापूर येथील 91, बार्शीटाकळी येथील 15, पातूर येथील दोन, बाळापूर येथील 12, तेल्हारा येथील 16 व अकोट येथील 18 जण रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात 53 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण 437 जणांचे  अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

284 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 284 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

एकाचा मृत्यू

दरम्यान काल एकाचा मृत्यूची नोंद झाली. त्यात सांगावी जामदेव ता. बाळापूर येथील 36 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.17 जानेवारी रोजी दाखल केले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

2152 जणांवर उप चार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 61153(45896+14761+496) आहे. त्यात 1146 मृत झाले आहेत. तर 57855 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 2152 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 562 चाचण्यात 32 पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.19) दिवसभरात झालेल्या 562 चाचण्या झाल्या त्यात 32 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात बाळापूर येथे सहा, बार्शीटाकळी येथे पाच, पातूर येथे चार, तेल्हारा येथे सात, मुर्तिजापूर येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर अकोला ग्रामीण येथे 122 चाचण्यात पाच, अकोट येथे 81 चाचण्यात 10, अकोला महानगर पालिका क्षेत्रात 197 चाचण्यात तीन, जिल्हा आरोग्य कर्मचारी 54 चाचण्यात चार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 53 चाचण्यात चार, हेडगेवार लॅब येथे 31 चाचण्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, से एकूण 562 चाचण्यात 32 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ