‘चायनीज मांजा’ आणि प्लास्टीक कॅरीबॅग विक्रेत्यांवर कारवाईसाठी भरारी पथक नियुक्त; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 अकोला दि.४ जिमाकाजिल्ह्यामध्ये नायलॉन मांजा वापर व विक्री यावर प्रतिबंध असल्याबाबतचे चे आदेश निर्गमित (दि.३) करण्यात आले आहेत. तथापि या आदेशान्वये कारवाई करण्यासाठी चायनीज (नायलॉन) मांजा तसेच ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडी असणाऱ्या प्लास्टीक कॅरीबॅग विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने चायनीज मांजा व प्लास्टिक थैली विक्रेत्यांवर कारवाई करावयाची आहे. चायनीज मांजामुळे दुखापतग्रस्त पक्षांना तातडीने उपचार सुविधा मिळावी यासाठी सेव्ह बर्डस या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधीही या पथकात आहेत. स्वतः जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी  या पथकाच्या अध्यक्ष आहेत.

त्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली पथकाचे गठण करण्यात आले आहे.

नियंत्रण अधिकारीः- अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, महानगरपालिका सहा. आयुक्त पुनम कळंबे, प्रदुषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशीक अधिकारी प्रशांत होळकर, सेव्ह बर्ड संस्थेचे अध्यक्ष ॲड. राखी वर्मा.

पथक प्रमुख : प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी प्रशांत मेहरे,

पथक सहाय्यकाचे नाव व पदनाम : सुरेंद्र जाधव म.न.पा. पोलीस कर्मचारी मेघ शाह, सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी मोक्षीत दोषी सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी, संतोष मोहोकार म.न.पा. पोलीस कर्मचारी गौरव मार्य सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी, रविंद्र निवाणे म.न.पा. पोलीस कर्मचारी गुंजन हिंगे सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी भुषण पिंपळगांवकर सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी.

पथक प्रमुख : नंदकिशोर पाटील क्षेत्रीय अधिकारी प्रदुषण नियंत्रण मंडळ

            सुधाकर सदाशिव म.न.पा. पोलीस कर्मचारी मयुर दोषी सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी, राजकुमार जुनगडे म.न.पा. पोलीस कर्मचारी निलेश जैन सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी, इकबाल खान म.न.पा. पोलीस कर्मचारी भुमिका दोशी सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ