कोविडः आरटीपीसीआर ‘निरंक’ व रॅपिड ॲन्टीजेन 'एक'पॉझिटीव्ह

 अकोला दि.(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ३२९ अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचेही अहवाल पॉझिटीव्ह आले नाही, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

 दरम्यान काल (दि. १) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७९१७(४३३०३+१४४३७+१७७)  झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर शून्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह एक.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३४४७७२ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३४१११६ फेरतपासणीचे ४०२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३२५४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३४४७७२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३०१४६९ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

शून्य पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

१३ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७९१७ (४३३०३+१४४३७+१७७) आहे. त्यात ११४२ मृत झाले आहेत. तर ५६७६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १३ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः१७३चाचण्यात एकपॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.१) दिवसभरात झालेल्या १७३ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

      काल दिवसभरात  मुर्तिजापूर येथे दोन, अकोला महानगरपालिका क्षेत्रात १३२, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे ३४, हेडगेवार लॅब येथे पाच अशा एकूण १७१ चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ