पशुसंवर्धन विभाग; विविध योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑनलाईन अर्ज करा


अकोला, दि.21(जिमाका)- पशुसंवर्धन विभागाच्या राष्ट्रीय पशुधन अभियानातर्गंत शेळी-मेंढी पालन, कुक्‍कुट पालन, वराह पालन अशा अनेक व्यवसायाकरीता शासनाव्दारे अनुदानास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन इच्छुक लाभार्थी व संस्थानी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन विभागाचे सचिन्‍द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

शासनाच्या पशुसंवर्धनाच्या उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत शेळी-मेंढी पालन, कुक्‍कुट पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियांनांतर्गत मुरघास निर्निती, टीएमआर व फॉडर ब्‍लॉक निर्निती तसेच वैरण बियाणे उत्‍पादन या योजनांकरीता 50 टक्‍के अनुदान उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे. अनुदानाची अधिकता मर्यादा शेळी-मेंढी पालनाकरीता 50 लक्ष रुपये, कुक्‍कुट पालनाकरीता 25 लक्ष रुपये,  वराह पालनाकरीता 30 लक्ष रुपये आणि पशुखाद्य व वैरण विकासाकरीता 50 लक्ष रुपये आहे.  प्रकल्‍पाकरीता स्‍वहिस्‍सा व्‍यक्तिरीक्‍त उर्वरित आवश्‍यक निधी बॅकेकडून कर्जाव्‍दारे उपलब्‍ध करून घ्‍यावयाचा आहे. योजनेचा लाभ व्‍यक्‍तीगत व्‍यवसायीक, स्‍वंय सहाय्यता बचत गट, शेतकरी उत्‍पादक संस्‍था, शेतकरी सहकारी संस्‍था, कलम आठ अंतर्गत स्‍थापन झालेल्‍या कंपनी सहकारी दुध उत्‍पादक संस्‍था, सह जोखिम गट (जेएलजी),  सहकारी संस्‍था, खाजगी संस्‍था , स्‍टार्टअप ग्रुप इत्‍यादी घेवू शकतात.

आवश्यक कागदपत्रे : योजनांच्‍या लाभकरीता ऑनलाईन पध्‍दतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज सादर करताना सविस्‍तर प्रकल्‍प अहवाल(डीपीआर), पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवाशी पुरावा(मतदान ओळखपत्र, वीज देयकाची प्रत) छायाचित्र बँकेचा रद्द केलेला चेक इत्यादी कागदपत्रे (अपलोड) आहे. याशिवाय अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळ, आयकर रिटर्न, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र, जीएसटी  नोंदणी इत्‍यादी कागदपत्रे उपलब्ध असल्यास जोडावे.

योजनेच्‍या सर्व मार्गदर्शक सूचना, वारंवार विचारण्‍यात येणारे प्रश्‍न, अर्जाचा नमूना इत्‍यादी पंशुसंवर्धन विभागाच्‍या संकेतस्‍थळ https://maharashtra.gov.in व केंद्र शासनाच्या संकेतस्थळ http://www.nlm.udyamimitra.in  यावर उपलब्ध आहे. पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी जिल्ह्यातील सर्व इच्छुक लाभार्थी व संस्थानी लाभ घ्यावा, असे आवाहन पुशसंवर्धन विभागाव्दारे करण्यात आला आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ