कोविडःआरटीपीसीआरमध्ये 296 पॉझिटिव्ह, 438 डिस्चार्ज;रॅपिड ॲन्टीजेन नऊ पॉझिटीव्ह


अकोला दि.26(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 740 अहवाल प्राप्त झाले. त्यात 264 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 32 असे एकूण 296 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 438 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.25) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 63243(47649+14843+751) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 264 व खाजगी 32) 296 रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 9 एकूण पॉझिटीव्ह 305.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 358921 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 354869 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3642 नमुने होते. आजपर्यंत एकूण 358921 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 311272 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 296 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 264 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 104 महिला व 160 पुरुष रुग्ण आहेत.  त्यातील 139 जण हे अकोला हरातील, अकोला ग्रामीण येथील पाच, मुर्तिजापूर येथील 42, बाळापूर येथील 11, अकोट येथील 14, तेल्हारा येथील 21, बार्शीटाकळी येथील 15 व पातूर येथील 17 जण रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात 32 अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण 296 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

438 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 438 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

2533 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 63243(47649+14843+751) आहे. त्यात 1151 मृत झाले आहेत. तर 59559 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 2533 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 363 चाचण्यात नऊ पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.25) दिवसभरात झालेल्या 363 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात बाळापूर येथे तीन, बार्शीटाकळी येथे दोन, पातूर येथे एक, मुर्तिजापूर येथे एक, अकोला महानगर पालिका क्षेत्रात 215, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 43 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर अकोला ग्रामीण येथे 10 चाचण्यात तीन, अकोट येथे 53 चाचण्यात दोन, तेल्हारा येथे पाच चाचण्यात एक,  जिल्हा आरोग्य कर्मचारी चार चाचण्यात एक, हेडगेवार लॅब येथे 26 चाचण्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलासे एकूण 363 चाचण्यात नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ